पुणे : तुम्ही फेसबूक वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. फेसबूक एक महत्वपूर्ण अपडेट करत आहे. या अपडेटनुसार तुमच्या फेसबूक प्रोफाइलमध्ये लवकरच मोठे बदल बघायला मिळतील.
हा नवा बदल 1 डिसेंबरपासून अप्लाय होणार आहे. या अपडेनुसार फेसबूकच्या प्रोफाईलवरुन काही महत्वपूर्ण गोष्टी हटवण्यात येणार आहे. तरी फेसबूकडून हा नवा अपडेटका लॉंच करण्यात आला या मागचा उद्देश अजून तरी स्पष्ट झालेला नाही.
सध्या तरी फेसबूक म्हणजेच मेटा कडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सोशल मीडिया कन्सल्टंट मॅट नवरा यांनी याबाबत ट्विट करत या बदलांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. यांत त्यांनी फेसबूक इंटरेस्टेड इन आणि रिलेजीअस व्हूव्ह 1 डिसेंबर पासून काढून टाकणार असल्याची माहिती दिली आहे.
हे होतील बदल..
तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर , धार्मिक विचार , पत्ते आणि राजकीय विचार यासारख्या गोष्टी दिसणार नाहीत.
सध्या तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर तुमची शाळा, कॉलेज , नोकरीचं ठिकाण , तुमच मुळगाव, तुम्ही हल्ली कुठल्या शहरात असता , मोबाईल नंबर, ईमेल अडरेस, लिंग, जन्मतारीख , इन्टरेंस्टेड इन, रिलेशनशीप स्टेटस यासारख्या गोष्टी ॲड कराव्या लागतात.
त्यातील कुठल्या गोष्टी पब्लिक ठेवायच्या कुठल्या गोष्टी फ्रेन्डस तर कुठल्या गोष्टी प्रायवेट याबाब तुम्ही ठरवू शकता. त्याप्रकारची सेटींग करण्याची तुम्हाला मुभा असते पण यांत आता खुद्द फएसबूक कडूनचं मोठे बदल करण्यात आले आहेत.