शरीर जेव्हा थकतं तेव्हा प्रत्येकालाच झोपेची गरज असते. दररोज पुरेशी झोप अनेक आजारांना आमंत्रण देण्यापासून दूर ठेऊ शकते. त्यामुळे झोप चांगली लागावी याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. झोपेसाठी योगासने फायद्याची ठरू शकतात. नाहीतर अनेक आजार बळावू शकतात.
झोपेच्या कमतरतेमुळे दीर्घकाळ गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. हृदयाचे आरोग्य आणि लठ्ठपणाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनच्या पातळीत असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. यासोबतच शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे योगासने अथवा व्यायाम केल्यास यातून मोठा फायदा होऊ शकतो.
झोपेच्या कमतरतेमुळे तणाव आणि नैराश्येसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो आणि एकाग्रता कमी होते. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे रोगांचा धोका वाढतो. दीर्घकाळ झोप न लागल्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यामुळे झोप पुरेशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.