पुणे : ‘इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात IDBI बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी-डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रमुख-डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी-डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई / नवी मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पदव्युत्तर किंवा बॅचलर पदवी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : rec.experts@idbi.co.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.