हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा, व सांस्कृतिक महोत्सव बीट स्तरीय स्पर्धेचे आयोजन अष्टापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते. या बीटस्तरीय स्पर्धेत सोरतापवाडी, शिंदवणे, अष्टापूर, कुंजीरवाडी या चार केंद्रातील ३६ शाळांनी सहभाग घेतला होता.
अष्टापूर बीट स्तरावर यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत लहान व मोठा गट यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धावणे, गोळा फेक, थाळीफेक, उंचउडी, लांबउडी, वक्तृत्व, खो खो, कबड्डी, भजन स्पर्धा, लोकनृत्य आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, स्पर्धेसाठी शालेय व्यवस्थापन समिती, न्यू इंग्लिश स्कूल आष्टापुर, परिसरातील शिक्षक पंच, अष्टापूर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि अष्टापुर केंद्रातील सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या निकाल प्रसंगी विद्यार्थ्यांना चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच सोमनाथ कोतवाल, श्रीहरी कोतवाल, सुभाष कोतवाल, किरण कोतवाल, शिवाजी घोगरे, शब्बीर शेख, चिंतामण अव्दैत, महेंद्रकुमार मोरे, रमेश कुंजीर, तुकाराम कांबळे, संदीप कोतवाल, संतोष शितोळे, नितीन मेमाणे, योगेश जगताप, शशिकांत चौधरी, केतन निकाळजे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सविस्तर निकाल :
बीट स्तरीय स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे कंसात शाळेचे नाव
धावणे मुले :
लहान गट : प्रथम सिद्धार्थ गायकवाड (पेठ).
मोठा गट : प्रथम जुनेद इद्रिसी (उर्दू शाळा उरुळी कांचन),
धावणे मुली
लहान गट : प्रथम रुपाली थोरात (हिंगणगाव),
मोठा गट : प्रथम सायली सावंत (सोरतापवाडी)
गोळा फेक
मुले : अफजल फरहान (उर्दू शाळा उरुळी कांचन)
मुली: सुष्टी महाडिक (शिंदवणे)
थाळीफेक
मुले : जुनेच इद्रिसी (उर्दू शाळा उरुळी कांचन)
मुली : अंबिका सुरवसे (पेठ)
उंचउडी
लहान गट : मुले प्रथम तन्मय कोतवाल (अष्टापूर),
मोठा गट : मुले प्रथम जूनेद इद्रिसी (उर्दू शाळा उरुळी कांचन)
उंचउडी मुली
लहान गट : मनस्वी घोलप (वळती),
मोठा गट : ऋतिका महाडिक (शिंदवणे)
लांबउडी मुले
लहान गट: संकेत कांबळे (शिंदवणे)
मोठा गट : जुनेद इद्रिसी (उर्दू शाळा उरुळी कांचन)
मुली मोठा गट : रुपाली थोरात (हिंगणगाव)
मोठा गट : आर्या वाघमारे (सोरतापवाडी)
वकृत्व स्पर्धा
लहान गट : श्रावणी बनकर (कुंजीरवाडी)
मोठा गट : मानसी सगर (नायगाव)
खो-खो
खो-खो मुले लहान गट : – सोरतापवाडी,
खो-खो मुली लहान गट : – शिंदवणे,
मुले मोठा गट : – सोरतापवाडी,
मुली मोठा गट : उर्दू शाळा उरुळी कांचन
कबड्डी
मुले मोठा गट : उर्दू शाळा (उरुळी कांचन),
भजन स्पर्धा :
लहान गट (आळंदी म्हातोबाची)
मोठा गट प्रथम – (श्रीप्रयागधाम)
लोकनृत्य
लहान गट : – धुमाळ मळा थेऊर फाटा,
लेझीम
मोठा गट (नायगाव)