भंडारा : आजकाल रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं जणू ट्रेंड झाला आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच हॉटेल, रेल्वे स्थाकावर तर भररस्त्यात अनेक जण विविध कन्टेन्टवर व्हिडीओ शूट करत असतात. त्यात गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना गाडीच्या बोनेटवर बसून त्यांनी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा बोनेटवर बसून रील बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूरपरिस्थितीने नागरिक त्रस्त झालेले असताना खासदाराचा हा रील समोर आल्याने आता खासदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न देखील आता नागरिक उपस्थित करीत आहे.
मतदारसंघात एकीकडे पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे, मोठं नुकसान झालं आहे, जनजीवन विस्कळीत झालं असताना आपला खासदार आपल्या समस्या सोडवण्यापेक्षा हे रील करत आहेत, याबाबत काहींनी संताप व्यक्त केला आहे. हे रील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गाडीच्या बोनेटवर बसून केला जीवघेणा स्टंट#Bhandara #Congress #PrashantPadole pic.twitter.com/XYepIaF9We
— Rahul Maknikar (@maknikar09) September 12, 2024