नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच आहे. बुधवारी (दि.11) वाराणसी, यूपीमध्ये सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली. बाजार सुरू होताच सोने 30 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी महागली आहे. त्यानंतर त्याची किंमत 86,000 रुपये इतकी झाली.
बुधवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 30 रुपयांनी घसरून 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी त्याची किंमत 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी त्याची किंमत 30 रुपयांनी घसरली. त्यानंतर बाजारात त्याची किंमत 66,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी त्याची किंमत 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.
सध्या सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत असले तरी पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 72,212 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,760 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 83,900 रुपयांवर गेले आहेत.