पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर भारतीय रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्थात घरबसल्या अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
भारतीय रेल्वेच्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. या विभागात सहाय्यक अभियंता हे पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखत, चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक अभियंता.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
– वयोमर्यादा : 55 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.