पुणे : शिवजीनगरचे माजी आमदार विनायकजी निम्हण यांच्या पाठोपाठ त्यांच्या मातोश्री सावित्री महादेव निम्हण यांचे अवघ्या २० दिवसांच्या आत शनिवारी (ता. १९) वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
निम्हण कुटुंबियांना २० दिवसांच्या आत दुसरा धक्का बसल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. तर त्यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे शनिवारी वृद्धापकाळाने संध्याकाळी निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी (ता. २०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाषाण येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.