लोणी काळभोर : सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या अत्याचारातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर विवाहासाठी जात आडवी येत असल्याने पिडीतेचा उरुळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पॉस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी १९ वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका २४ वर्षाच्या तरुणावर शुक्रवारी (ता. ६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा धनकवडी (पुणे) व लोणी काळभोर येथील ग्रीन व्हॅली (होमली) लॉज सन २०२२ ते २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षापूर्वी पिडीत मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी आरोपीने पिडीतेवर प्रेम असून तिला लग्नाचे आमिष दाखविले. आरोपीच्या लग्न करण्याच्या दिलेल्या आमिषाला पिडीता बळी पडली. त्यानंतर आरोपीने पिडीतेला त्याच्या धनकवडी (पुणे) येथील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या दुकानामध्ये बोलाविले. त्यानंतर आरोपीने दुकानामध्येच पिडीतेसोबत ऑक्टोबर २०२२ साली शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने पिडीतेला लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन व्हॅली (होमली) लॉजवर नेवून वारंवार शाररीक संबंध प्रस्तापित केले.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या अत्याचारातून फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिली. पिडीता गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने पिडीता यांना त्यांच्या आईसमोर वेगळ्या जातीचे असल्याचे कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या गर्भातील १० आठवडे १५ दिवस वयाचे बाळाचा उरुळीकांचन येथील एका खाजगी रुग्णालयात गर्भपात करून घेतला आहे.
याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कलम व अनुसुचीत जमाती (अत्याचारास प्रतिबंधक) अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०१५ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर परिमंडळ ५ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.