गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : गुलाल फुलांची उधळण, टाळ्यांच्या नाद आणि गणपती बाप्पा मोरया मोरयाच्या गजरात शनिवारी (ता. 07) सकाळपासून डोर्लेवाडी (ता. बारामती) परिसरातील वातावर भक्तिमय झालं आहे. भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन असल्याने घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत होताना दिसत असून या चैताण्यापुर्वामुळे भाविकांमधील उत्साह शिगेला पोहोचला आहे.
भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात बाप्पांचे स्वागत केले. आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती. तर काल सायंकाळी तर डोर्लेवाडी व परिसरातील बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी तसेच मंडळात आगमन होत आहे.
दरम्यान, घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले जात असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात येत आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. तर आजही खरेदीसाठी डोर्लेवाडी व परिसरातील भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.
दरम्यान, डोर्लेवाडी परिसरातील सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पांचे आगमन व स्थापना धुमधडाक्यात झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरु आहे. ढोलताशे, सनई-चौघड्याच्या निनादात गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी तयारी जोरदार सुरु आहे.