उरुळी कांचन : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या उपस्थितीत लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील अनेक तरुणांनी शुक्रवारी (ता. 06) राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रभाव वाढत चालला आहे.
हवेली तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर यांच्या हस्ते या तरुणांचा सत्कार करून त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यानी प्रवेश करून पदभार स्वीकारला आहे.
यामध्ये लोणी काळभोरच्या माजी उपसरपंच प्रियांका सचिन काळभोर, सदस्य गणेश कांबळे, सामजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, सुरेश काळभोर, पोपट जाधव, अतुल शिंदे, राजाराम जवळकर, समीर भिसे, ज्ञानेश्वर काळभोर, विशाल लोणारी, दीपक चौधरी, तुषार ताम्हाणे, तुषार राहिंज, शांताराम कटके, आदींनी प्रवेश केला आहे.
सध्या घडणाऱ्या राजकीय पार्श्वभूमीवर नक्की कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा या विचारात सध्या तरुणाई आहे. हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी अनेक तरुणांना पक्षात काम करण्यात संधी दिली आहे. शुक्रवारी (ता. 06) अनेक तरुणांनी दिलीप वाल्हेकर यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या सहकार्याने काम करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, असे या कार्यकर्त्यांनी संगितले.
यावेळी शांताराम कटके, सोमनाथ आव्हाळे, युवराज काळभोर, किरण वाळके, रमेश काळभोर, नवनाथ गायकवाड, सुनील कांचन, सतीश काळभोर, सचिन वाघुले, स्वप्नील काळभोर, संदीप कुंजीर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप वाल्हेकर म्हणाले, पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य या युवा पिढीकडून होईल याची खात्री आहे. तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष वाढीचे काम सुरूच राहणार आहे. अजितदादांच्या विकासात्मक भूमिकेला आदर्श मानून कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी पक्षवाढीचे काम सुरूच आहे.