Alcohol addiction : मद्यपान आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. हे माहिती असतानाही अनेक जण मद्याच्या प्रचंड आहारी गेलेले आपल्याला आजूबाजूला दिसून येतात. असच मद्याच व्यसन एकाला चांगलंच अंगलट आलं आहे. जास्त प्रमाणात आणि सातत्याने मद्यपान केल्याने या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट खराब झाल्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून ते कापून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. नेमकं प्रकरण काय? आपण जाणून घेऊ.
काही जणांचं व्यसन हे टोकाला पोहचलेलं असतं, की त्यांना कोणत्याही परिस्थितीत दारू हवीच असते. अशा व्यक्ती शेवटी गंभीर आजाराला बळी पडतात. एका व्यक्तीला जास्त मद्यपान केल्याने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि डॉक्टरांना त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
गुप्तांगात झालं गँगरीन..
‘द मिरर’च्या वृत्तानुसार, 65 वर्षांची एक व्यक्ती तीव्र ताप आल्याने रुग्णालयात दाखल झाली.डॉक्टरांनी तपासणी केली असता, व्यक्तीच्या गुप्तांगात संसर्ग झाला असल्याचे दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याला इंजेक्शन दिलं; पण त्याची प्रकृती अधिकच खालावली. रुग्णाला बरं न वाटल्याने तो परत डॉक्टरांकडे गेला. त्या वेळी डॉक्टरांनी त्याचं गु्प्तांग कापण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गु्प्तांगात गँगरीन झालं होतं. त्यामुळे त्यातल्या पेशी काळ्या पडल्या होत्या. अति मद्यपानामुळे गँगरीन आणि मूत्रविसर्जनाशी संबंधित समस्या निर्माण होतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.
जास्त मद्यपान करत असल्याने संसर्ग..
डॉक्टरांनी सांगितलं, की ‘या व्यक्तीच्या लिंगावर इस्केमिक गँगरीन होणं ही दुर्मीळ घटना आहे. कारण या अवयवात पुरेसा रक्तपुरवठा होत असतो.’ रुग्णाला डॉक्टरांनी या आजाराची माहिती देऊन उपचार सांगितले. रुग्णाने उपचारांना सहमती दर्शवली. ही व्यक्ती जास्त मद्यपान करत असल्याने गँगरीन झालं, असं सांगितलं जात आहे. अशा प्रकारची गंभीर जोखीम कमी करण्यासाठी मूत्ररोगतज्ज्ञाचा तात्काळ सल्ला घ्यावा. गँगरीन ही अशी स्थिती आहे, ज्यात रक्तप्रवाह कमी झाल्याने शरीरातल्या पेशी मरतात. हे प्रामुख्याने कोरडेपणा, ओलसरपणा आणि गॅस अशा तीन प्रकारे परिणाम करते.