सासवड : पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे सुरु असलेल्या भाऊसाहेब शिंदे यांच्या आमरण उपोषणाला आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच विविध संघटनेकडून पाठिंबा मिळाला आहे. आज उपोषणस्थळी पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, गोपनीय अधिकारी रुपेश भगत यांनी भेट देऊन रामोशी समाजाचे शिलेदार भाऊसाहेब शिंदे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतू शिंदे यांनी उपोषणावर ठाम असून उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा घेतला आहे.