पुणे : पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेनं एकच खळबळ उडाली होती. आधी गोळीबार केला गेला होता आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर करण्यात आले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हत्येचं खरं कारण समोर..
वनराज आंदेकर यांच्या हत्येमागील खरं कारण आता समोर आलं आहे. पूर्ववैमानस्य आणि बदला घेण्यासाठीच आंदेकर यांची हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाला आहे. आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. गायकवाडने त्याचा साथीदार निखिल आखाडेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा सुद्धा संशय आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रावरने वार करण्यात आले होते, ज्यामध्ये आखाडेचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.