LifeStyle : आपण तरूण दिसावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, फेस पॅक असो किंवा इतर काही गोष्टींचा अवलंब केला जातो. कारण, जसंजसं वय वाढतं तसंतसं चेहऱ्यावर सुरकुत्या येतात अथवा फ्रेशनेस जातो. त्यामुळे हा फ्रेशनेस पुन्हा मिळावा, यासाठी अनेकांची धडपड सुरु होते. पण अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
पाण्याची कमतरता हे देखील चेहऱ्यावर लवकर वृद्धत्व येण्याचे एक कारण असू शकते. त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या. त्वचा कधीही कोरडी आणि निर्जीव दिसणार नाही. शरीराची तंदुरुस्ती फक्त रात्रीच होते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. जर झोप पुरेशी मिळाली नाहीतर त्वचा निस्तेज होते आणि चेहरा सुरकुत्याने भरलेला दिसून येतो. हे टाळण्यासाठी दररोज 7-8 तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.
पालक, मोहरी आणि मेथी यांसारखे अँटीऑक्सिडंट, पॉलिफेनॉल आणि क्लोरोफिल समृद्ध पोषक घटकांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य यांसारख्या पोषक घटकांचा आहारात समावेश करावा. जास्तवेळ उन्हात थांबू नये. उन्हात जास्तवेळ थांबल्यास त्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.