लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षीही आपला दबदबा कायम ठेऊन अजिंक्य पद पटकावले. त्यामुळे विजेत्या खेळाडूंचे व शाळेचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी (ता. हवेली) नूतन माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 3 व 4 सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील एकूण 32, 17 वर्षे वयोगटातील एकूण 28 तर 19 वर्षे वयोगटातील एकूण 6 संघ सहभागी झाले होते.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या सतरा वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालय यांच्या सोबत झाला. हा सामना विद्यालयाच्या खेळाडूंनी 11 गुणांनी जिंकला. विद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटाचा अंतिम सामना वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासोबत झाला. हा सामना विद्यालयाने तेरा गुणांनी जिंकला. तर विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटाचा अंतिम सामना वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालय यांच्या सोबत झाला. या सामन्यामध्ये विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघास ट्रॉफी व एक हजार रुपये रोख व उपविजेत्या संघास ट्रॉफी व पाचशे रुपये रोख देऊन आयोजकांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुरेश कोरे, राजेश चौरे व सुनील टिळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर विद्यालयाच्या वतीने विजेते खेळाडू व क्रीडाशिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी, पर्यवेक्षक विलास शिंदे, नरसिंह जाधवर, ज्येष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे, कल्पना बोरकर, शशीराव शेंडगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १७ व १९ वर्षे वयोगटात पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी प्रथम क्रमाक पटकाविला आहे. तर १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थींनी उपविजेते पद पटकाविले आहे. त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
१४ वर्षे वयोगटातील खो-खो संघातील मुलांची नावे
साहिल वडतीले,रुद्र तांदळे,सोहम जाधव, श्रेयस सूर्यवंशी, विनायक गायकवाड, आशुतोष लंगर, अमरजीतकुमार यादव, नचिकेत मोरे, संगम ठाकूर, प्रेम क्षीरसागर, श्रवण अंबरीत, सार्थक जाधव, यश ठाकूर, भावेश पैकी,श्रेयश राठोड.
१७ वर्षे वयोगटातील खो-खो संघातील मुलांची नावे
रोहन खामकर, सोहम खामकर, रेहान सय्यद, प्रशांत खरात, प्रणय शेंडगे ,ऋषिकेश साळुंखे, आर्यन हालमे,रोहन होवाळ, प्रतीक कोरपे, अरमान कोरबू, कार्तिक खोचरे, गोविंद भाग्यवंत,अभिषेक कोळी, सोहेब मटके, सुमित मोरे.
१९ वर्षे वयोगटातील खो-खो संघातील मुलांची नावे
वाडकर रोहित, दळवी प्रथमेश ,काळभोर तनिष्क ,कोरडे आदेश ,सोनकांबळे रत्नदीप ,काकडे आतिश ,तावरे सार्थक ,खंडागळे कुणाल, साबळे संग्राम ,कांबळे सुबोध ,टमट्टा मेघराज