मुंबई : बँका आणि वित्तीय संस्थांकडून सहज उपलब्ध होणाऱ्या वैयक्तिक कर्जांमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. वार्षिक आधारावर, जुलै अखेरीस ते 14.4 टक्क्यांनी वाढून 55.3 लाख कोटी रुपये झाले आहे. तर यातील महत्त्वाची बाब म्हणजे गृहकर्ज अर्थात होम लोनची मागणी कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, पर्सनल लोनमध्ये वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या थकबाकीत जुलै अखेरपर्यंत सर्वात वेगाने वाढ झाली आहे. मात्र, बँकांच्या एकूण कर्जामध्ये त्याचा वाटा केवळ एक टक्का आहे. वार्षिक आधारावर 22 टक्के वाढीसह ते 2.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
त्याचप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जात 39 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. मात्र, एकूण वैयक्तिक कर्जामध्ये त्याचा वाटा केवळ 0.8 टक्के आहे. तसेच गृहकर्जाची मागणी सर्वात कमी असल्याचेही समोर आले आहे. या कालावधीत त्याचा वेग केवळ 12.8 टक्के वाढला आहे. एकूण गृहकर्जाचा कल हा आता 28 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.