पुणे : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील फरार झालेल्या आरोपींना ताम्हिणी घाटात उचललं आहे. या सर्व आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. मात्र, पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींना बेड्या आहेत. दरम्यान, याआधी वनराज आंदेकर याच्या बहिणींना पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास ताम्हिणी घाटातून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षांत राजकारणात सक्रिय झालं आहे. मात्र, शहराच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे . त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर शहरातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती.
नेमकं काय घडलं?
नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी दुचाकीवर येत भर चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने सपासप वार करत खून केला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. त्यातच वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.