पुणे : श्रावण महिना संपातला आणि चिकन, मटण आणि माश्यांच्या दरामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून आले. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मासांहार करणं टाळत असतात. त्यामुळे चिकन, मटण आणि माश्यांचे दर कमी झाले होते. पण आता श्रावण महिना संपला त्यानंतर आता खवय्यांनी मटन, चिकनच्या दुकानावर मोठी गर्दी केली आहे. चिकन, मटणच्या दरामध्ये नेमकी किती रुपयांनी वाढ झाली हे जाणून घेऊ..
मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्याने आज पुण्यात मटण, चिकनची जोरदार विक्री होणार असून श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणीच मानला जातो. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे. मटण-चिकनच्या शॉपबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या निमित्ताने हैद्राबाद, मध्यप्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे चिकन बाजारात मोठी उलाढाल..
मटण, चिकन विक्रीने आज पुणे बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. असून आज मटण 740 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. चिकन 200 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर मच्छी 220 रुपये किलो दराने विकली जात आहे. श्रावण संपल्यानंतर आता मटण, चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे.
पुण्यातील आजचे भाव
चिकन : 200 रुपये किलो,
मच्छी : 220 रुपये किलो,
मटण : 740 रुपये किलो