उत्तर प्रदेश : देशभरात बलात्कार- हत्या प्रकरणामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात मुलींच्या अपहरणाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
अपहरण करण्यात आलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही अल्पवयीन मुलगी मेरठ येथील जल निगम येथील रहिवासी आहे. ती 7 वर्षाची आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे, अल्पवयीन मुलगी शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तेवढ्यात एका कार चालकाने तिला बळजबरीने कारमध्ये बसवले. त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
मेरठ में बड़ी वारदात दिनदहाड़े जलनिगम के जेई की 7 साल की बेटी को घर के बाहर से किया किडनैप, कर में डालकर बच्ची को ले गए बदमाश। किडनैपिंग का CCTV आया सामने। घर के बाहर से स्कूल यूनिफॉर्म में बच्ची को किडनैप किया गया।
मुस्लिम परिवार की बेटी का किया गया अपहरण। pic.twitter.com/fRg3qYBj9P— shalu agrawal (@shaluagrawal3) September 2, 2024
अल्पवयीन मुलीला अपहरण केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलीच्या अपहरणांसदंर्भात पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.