दौंड : दौंड तालुक्यातील शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि .31 ऑगस्ट रोजी पार पडली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद घेण्यात येते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषायांवरती चर्चा होते. वेगवेगळ्या उपक्रमांवरती चर्चा केली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढ करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येतात त्याबद्दल या शिक्षण परिषदेमध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात येऊन याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते वाढीसाठी होत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते.
शिंदेवाडी शाळेत केंद्रस्तरीय परिषदेचे वैशिष्ट्य
सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा हायस्कूल यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महिला पदाधिकारी यांना सुद्धा यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सखी सावित्री मंच, विद्यार्थी सुरक्षा समिती, परिवहन समिती, त्याचबरोबर पास्को कायदा याविषयी सर्व शिक्षकांना त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व महिला पदाधिकारी यांना या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या परिषदेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून नानगाव हायस्कूलचे चंद्रशेखर मिसाळ व पारगाव हायस्कूलचे शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पारगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री कैलास आढागळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध जीआर चे वाचन करून दाखवले त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणून योग्य प्रकारे शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न अडागळे यांनी यामध्ये केला.
ही केंद्रपरिषद शिंदेवाडी शाळा कवडेवाडी शाळा मोसे बुद्रुक शाळा यांच्या नियोजनातून पार पडली. या शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या परिषदेसाठी पारगाव ग्रामपंचायत चे सदस्य संभाजी ताकवणे, बाजीराव तांबे, सुमन चव्हाण हे उपस्थित होते.
त्याचबरोबर केंद्रातील सर्व शाळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते यामध्ये शिंदेवाडी शाळेचे अध्यक्ष सुनील चव्हाण उपाध्यक्ष विशाल जेधे आणि माता पालक संघाच्या अध्यक्ष दिपाली काळे ह्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर या परिषदेसाठी शिक्षक समितीचे अध्यक्ष बापूराव खळदकर, अक्का मोरे, अश्विनी खळदकर, आढाव मॅडम हे उपस्थित होते . यावेळी सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप थोरात यांनी केले तर मुख्याध्यापक भानुदास भोसले व किसन दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.