अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : तुळापूर फाटा लोणीकंद ते शिरूर बायपास दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करताना प्रवासी महिलेचे पर्समधील तीन लाख रुपये किमतीची सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास तुळापूर फाटा ते शिरूर बायपास जवळील रिलायन्स पेट्रोल पंप येथे घडली.
याबाबत नानासाहेब उर्फ भाउसाहेब शिवराम जऱ्हाड (वय-60 वर्षे, व्यवसाय शेती, रा. दसरेनगर, रूम नं. 11 वसंत टेकड़ी पाईपलाईन रोड अहमदनगर) महिलेचा पती यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तुळापूर फाटा ते शिरूर बायपास जवळील रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत प्रवास करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पत्नीचे पर्स मध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची मोहन माळ व तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.