वाघोली, (पुणे) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना हवेली पंचायत समिती हवेलीच्या वतीने सोमवारी (ता. १४) बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हवेली यांच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधून वाघोली येथील पाचर्णे सभाग्रहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, वाघोलीचे माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच कविता दळवी, निर्मला अडसूळ, प्रकल्प अधिकारी सुनीता शिंदे, सहायक प्रकल्प अधिकारी स्वाती पाठक, सुपरवायझर कुर्ले, किन्नी, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी व पालकांनी हजेरी लावली होती. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मुलांच्या पोषण आहारासाठी अक्षरापात्र तयार करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा घोरपडे यांनी मानले.