पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्यामधील दुसऱ्या मार्गिकचे काम ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून गणेश भक्त या दोन्ही मार्गिकांतून ‘गणपती बाप्पा’चा जयजयकार करत मार्गस्थ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा आ. भरत गोगावले यांच्यासह कशेडी बोगद्याची पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी ठेकेदारांना अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत दिवस-रात्र काम करून कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्यातील इतर महामार्ग चांगल्या पद्धतीने करण्यात आले असल्याचे सांगत मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून ग्रीन फिल्ड महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत करणार असून सरकार कोकणचा परिपूर्ण विकास करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.