लातूर : राज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत असून ही बाब चिंताजनक ठरू लागली आहे. अगदी दोन वर्षाची चिमुकली असो वा वयोवृद्ध महिला. यातून कोणताच वर्ग सूटत नाही आहे. अशातच मनाला हादरवून सोडणारी घटना लातूर येथे घडल्याचे समोर आले आहे. लातूरच्या औसा तालुक्यातही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी 31 वर्षीय नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.