-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेतामध्ये काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी गजाआड करून दोन गुन्हे उघडकीस आणले. त्यातील दोन लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी 121 किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास पथकाने आरोपी सुरज उर्फ मोन्या संजय रेडगे (वय 24 वर्षे, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे), प्रथमेश उर्फ संतोष सासवडे (वय 19, रा. बजरंग वाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे), त्याचप्रमाणे अनिकेत रमेश सरोदे (वय-20, ता. शिरूर जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करण्यात आला. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याचे दागिने इसमनामे अमोल एकनाथ पेटारे (वय 29, रा. बजरंगवाडी ता. शिरूर जि. पुणे) याला दिल्याचे सांगितले,
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता महिन्यामध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे उरळगाव येथे याच प्रकाराचा गुन्हा केलेला असल्याचे कबूल केले आहे
सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 657/ 2024 कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा इसमाने अभिषेक सुभाष विटेकर (रा. बुरुंजवाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांना घेऊन केला होता. ह्या आरोपीला अटक करून गुन्ह्यातील मंगळसूत्र कर्णफुले हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभाग, पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार तुषार बंधारे, दीपक साबळे, जनार्दन शेळके, संजू जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल ढेरे, राजू मोमीन, सागर धुमाळ, निलेश सुपेकर, नारायणगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केली. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे .