पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त कॅम्प परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. सोमवारी (दि. २६) कॅम्प येथील न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक सायंकाळी चारच्या सुमारास निघणार आहे.
वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग न्यू मोदीखाना येथून मिरवणुकीस सुरुवात होऊन न्यू मोदीखाना पुलगेट पोलिस चौकी, मेढी माता मंदिर, महात्मा गांधी रोडने डावीकडे वळून कुरेशी मस्जिदसमोरून सेंटर स्ट्रीट रोडने सरळ भोपळे चौक, सेंटर स्ट्रीट चौकी उजवीकडे वळून महावीर चौक डावीकडे वळून महात्मा गांधी रोडने कोहिनूर हॉटेल चौक ते पुलगेट पोलिस चौकी, मेढी माता मंदिर येथे विसर्जन होणार आहे.
बंद करण्यात येणारे मार्ग आणि पर्यायी मार्ग
गोळीबार मैदान चौकातून वाय जंक्शनमार्गे (पंडोल अपार्टमेंट) महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतूक ही वाय जंक्शन (पंडोल अपार्टमेंट) येथे बंद करून ती खाणे मारुती चौक येथे वळवण्यात येणार आहे. तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतूक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतूक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एमजी रोडकडे जाईल
- मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक बंद करून सदरची वाहतूक चुडामन तालीमकडे वळवण्यात येईल.
- व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, सदर वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीटने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
- महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, सदरची वाहतूक एमजी रोडने नाझ चौकाकडे वळवण्यात येईल.
- सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.
- बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, सदर वाहतूक शिवाजी मार्केटकडे वळवण्यात येईल.