उरुळी कांचन (पुणे) : पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व पुणे जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूल मधील वयोगट 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सुमारे 69 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा तीन दिवस चाललेल्या होत्या. अंतिम सामना हा एंजल हायस्कूल व न्यु इंग्लिश स्कूल लांडेवाडी या दोन संघात झाला. या सामन्यात एंजल हायस्कूलचा निसटता पराभव झाल्याने द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूल 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने अनुक्रमे आल्हाट हायस्कूल तळेगाव दाभाडे, पायस हायस्कूल शिरूर, डॉ.अस्मिता हायस्कूल उरुळी कांचन या संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
दरम्यान, विजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री संस्थेचे संचालक अविनाश शेलुकर, एंजल हायस्कूलचे प्राचार्य चेतन सोनवणे, उपप्राचार्या प्रीशीला जॉन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले. विजयी संघास क्रीडा शिक्षक सिद्धार्थ अग्रवाल, शकील शेख, सुलतान शेख व अस्मिता वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.