नारायणगाव : शेतीकाम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवुन लुटणाऱ्या सराईत गुन्हगार टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. मोजे कावळ पिंपरी गावच्या हद्दीत शेतीमध्ये दिवसा शेतीकाम करत जनावरे चारत असताना, मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देवून गळयातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८९ हजारांच्या मुद्देमालाची जबरी चोरी केली होती. भामाबाई बाबाजी येवले वय ६१ वर्षे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
सविस्तर माहिती अशी कि, सदर गुन्हयातील फिर्यादी नामे भामाबाई बाबाजी येवले वय ६१ वर्षे रा. पारगावतर्फे आळे ता. जुन्नर जि.पुणे या मोजे कावळ पिंपरी गावचे हद्दीत शेतीमध्ये दिवसा शेतीकाम करत जनावरे चारत असताना मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८९ हजारांची जबरी चोरी केली होती. त्यांच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे दि.१२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भरदिवसा रोडलगत जनावरे चारत असणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्हयाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची मोटार सायकल ज्या दिशेने गेली आहे. त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. फुटेजमध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाल्याने सुमारे १२० किमी पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सलग तीन दिवस तपासण्यात आले.
सदर गुन्ह्यातील संशईत मोटार सायकल शिक्रापूर परिसरात पोहाचली असल्याचे तपास पथकाला बातमी मिळाली होती. त्यानुसार गुन्हा करणारे आरोपी नामे सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे वय-२४ वर्ष रा.वजरंगवाडी, शिक्रापुर ता. शिरुर जि.पुणे, प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे वय-१९ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापुर, ता. शिरुर जि.पुणे, अनिकेत रमेश सरोदे, वय २० वर्षे, ता.शिरुर जि.पुणे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने अमोल एकनाथ पेटारे, वय- २९ वर्षे रा. बजरंगवाडी ता. शिरूर जि.पुणे याला दिल्याचे सांगितले. त्यांना अधिक विश्वासात घेवून तपस केला असता त्यांनी अभिषेक सुभाष पिटेकर रा. बुरुंजवाडी शिक्रापुर ता. शिरुर जि.पुणे याचे मदतीने मोजे उरळगाव ता. शिरूर जि पुणे गावचे हद्दीत महिलेचे दागिने लुटल्याचे सांगितले.
त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेक सुभाष पिटेकर रा. बुरुंजवाडी शिक्रापुर ता.शिरुर जि.पुणे याला देखील अटक करण्यात आली असून नमुद दोन्ही गुन्हयांतील चोरी गेलेले सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.