जालना : जालन्यामधून एका भीषण स्फोटाची बातमी समोर येत आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून या घटनेत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून २० जण जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाला. यामध्ये धक्कादायक बाब अशी कि वितळलेले लोखंड कामगारांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत.
दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक्षकांनी दिली माहिती! घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, बचाव पथकाने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमध्ये २० कामगार जखमी झाले असून यांपैकी ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळासह, रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून जबाब नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.