अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील चिंचणीच्या घोडधरण जलशयातून बोटीच्या सहाय्याने वाळू काढून विक्री होत होती. ही बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याने बोटीच्या सहाय्याने वाळु काढून चारचाकी वाहनातुन चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही जर चिंचणीच्या घोडधरण जलशयात वाळू ऊपसणाऱ्या बोटी आढळल्यास त्या बोटी फोडण्यासाठी पथके तयार करुण यंत्रणा सज्ज केली असून तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले आहे.