शिक्रापूर : दि.२२ शिरुर शहरातील सेंट जोसेफ’ या शाळेत रात्रीच्या वेळेत शिक्षक, शिक्षिकांचा मद्यधुंदअवस्थेत डिजेच्या तालावर डान्स चालु होता. जर शिक्षकच शाळेत असे वागत असतील तर विद्यार्थ्यांवर ते काय संस्कार करणार असा सवाल उपस्थित होत आहे. धांगडधिंगा घालणाऱ्या या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच या खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडून विदयार्थी घडवण्याची अपेक्षा आहे,त्यांच्याकडूनच समाज बिघडवण्याचे काम सुरू आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन सखाराम साळवे (वय ,४४ वर्ष )राहणार- .बगाड रस्ता, रामलिंग, शिरूर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. सुरेश चौगुले, अभिषेक जाधव व इतर १५ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २० जून २०२४ रोजी सुमन साळवे यांच्या घराच्या शेजारी असणारी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल बगाड रस्ता, रामलिंग, शिरूर येथे रात्री १०:३० वा सुमारास डी.जे वाजण्याचा कर्ण कर्कश आवाज येत होता .साळवे यांची मुले यु.पी.एस.सीचा अभ्यास करत असल्याने त्यांनी शाळेचे गेटवर जाऊन वॉचमन (नाव माहित नाही) कडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शाळेच्या आतमध्ये कोणाला तरी फोन केला.
त्यावेळी वॉचमनने सांगितले की,’ तुम्हालाच आत मध्ये बोलविले आहे’. म्हणून सुमन साळवे व त्यांचा मुलगा असे दोघेही शाळेचे आत मध्ये गेले. तेव्हा पुरुष व महिला असे १० ते १५ जण दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. म्हणून सुमन साळवे त्याचा व्हिडिओ प्रिन्सिपल मॅडमला दाखवण्यासाठी काढू लागल्या. त्यावेळी प्रिन्सिपल ज्ञानसी पायस व इतर दोन महिला आल्या. साळवेंनी ज्ञानसी पायस यांना, ’डी.जे चा आवाज कमी करा असे म्हणाले’ असता त्या सुमन यांना म्हणाल्या की, ‘तू कोण’ असे म्हणून इतर लोकांना म्हणाल्या की, ‘हिला धरून ठेवा आणि पोलिसांना बोलवा’. हे सगळे दारूच्या नशेत होते. सुमन साळवे तिथून बाहेर निघाल्या.
तेव्हा बाहेर जात असताना मॅडम (पूर्ण नाव माहित नाही) यांनी साळवे यांना लाथ मारली. त्यांचा मोबाईल काढून घेतला व त्यांचा मुलगा जीवन सखाराम साळवे यांस सुरेश चौगले यांनी गचांडले. त्यांचे साथीदार यांनी देखील धक्का-बुक्की केली. अंधार असल्यामुळे किती व्यक्ती होत्या हे त्यांना दिसले नाही. त्यानंतर प्रिन्सिपल ज्ञानसी पायस यांनी सुमन साळवे व त्यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली.
त्यानंतर सुरेश चौगुले व अभिषेक जाधव हे रस्त्याने येत- जात असताना शिवीगाळ करून सुमन साळवे यांचा मुलगा जीवन याला ‘खल्लास’ करून टाकतो, अशी धमकी देऊन,’ तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही ‘असे म्हणून त्रास दिला. त्यासंदर्भात दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय सुनिल उगले हे करत आहे.