LifeStyle : सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम महत्त्वाचा ठरतो. व्यायाम केल्याने अनेक फायदे होतात. व्यायामाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होतेच. शिवाय, शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते. याशिवाय, तुम्ही जर नैराश्येने ग्रासले असाल तर ते प्रमाण कमी करण्यास फायद्याचे ठरते.
व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायामामुळे आत्मिक समाधान मिळत असते. मन प्रसन्न राहण्यास मदत होते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण योग्य रीतीने होते. त्यामुळे शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त तर राहतोच. शिवाय त्यांचे कार्यही व्यवस्थित चालू राहते. तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल तर तुमचा मूड दिवसभर चांगला राहू शकतो.
व्यायाम केल्याने आनंदी आणि फ्रेश राहता येतं. त्यामुळे रोज सकाळी 25-30 मिनिटांचा व्यायाम पुरेसा आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात उत्साह वाटतो. डोक्यात नवीन कल्पना येतात, कामात प्रगती होते. त्यामुळे तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढण्याचा सल्ला दिला जातो.