पुणे : राज्य सरकारने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. तसेच सदर शासन निर्णयामधील सुचना किंवा आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक यांनी सुकाणू समिती गठीत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
शासन निर्णयातील सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांचे अध्यक्षतेखाली शासन निर्णयातील तरतुदीनुसार पोलीस महासंचालक यांनी ०८ मार्च २०२२ अन्वये सुकाणू समिती स्थापन केली. या समितीच्या राज्यातंर्गत १४ मार्च आणि ०५ मार्च २०२२,तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ११ एप्रिल २०२२ घटक प्रमुख यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सदर मंडळाच्या शिफारशीनुसार खालील नमूद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना या आदेशाच्या तारखेपासून श्रेणी उपनिरीक्षक संबोधण्यात येत आहे. २५ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयान्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
बढती झालेल्यांची नावे खालील प्रमाणे :
पोलीस अंमलदारांचे नांव सध्याच्या नेमणुकीचे ठिकाण
सिताराम जावाजी आसवले आळेफाटा
प्रदीप झोपा सपकाळे मुख्यालय
नवजिवन सिद्राम जाधव लोणावळा ग्रामीण
रवींद्र लक्ष्मण मोहरकर वडगांव निंबाळकर
संजय तुळशीराम तोंडे मुख्यालय
देवीदास रामचंद्र भिसे इंदापुर
शंकर विठ्ठल जम जिविशा
मुकुंद चंद्रकांत कदम स्थागुशा चालक
भागवत रामचंद्र शिंदे इंदापुर
शिरीष राजाराम लोंढे जेजुरी
अविनाश आनंदराव गायकवाड बारामती तालुका
भरत भगवान जाधव इंदापुर
पंडीत संपतराव मांजरे शिक्रापुर
अब्दुलखालिद अब्दुलरशिद शेख कामशेत
संतोष शिवाजी कुलथे मोपवि
दत्तात्रय बबन बालगुडे मुख्यालय
माणीक बाळासाहेब मांडगे शिरुर
सतीश तात्याबा कदम मुख्यालय
दत्तात्रय वामन कुंभार दौंड
संजय उत्तम ढावरे राजगड
सुरेश दौलत भोई एसडीपीओ बारामती
सुरेंद्रकुमार अनंत जाधव मोपवि
विद्याधर ज्ञानदेव निचीत पैरवी / टिएमसी
बाळासाहेब आत्माराम थोपटे वडगांव निबाळकर
प्रकाश शंकरराव वाघमारे स्थागुशा
मेहबुब ईस्माईल शेख एसडीपीओ हवेली
शशिकांत भिमराव खरात टिमसी सेंटर पुणे ग्रामीण
पुनाजी नामदेव जाधव खेड
सरस्वती रोहीदास आव्हाळे मुख्यालय
संगीता नवनाथ गाढवे मुख्यालय
आशा उत्तम पोटे सासवड
चंद्रकांत ज्ञानदेव झेंडे जेजुरी
महादेव सदाशिव कुतवळ जेजुरी
सुनिल शिवाजी साळुंके वडगांव मावळ
नामदेव आत्माराम नलवडे भिगवण
दिलीप गोविंद सुतार मसुप बारामती फाटा
रमेश रघुनाथ भिसे लोणावळा शहर
विजय शांताराम शेटे मसुप खंडाळा
अनिल चंद्रकांत बकरे जुन्नर
सुभाष कमाजी गारे रांजणगांव युनिट
पंढरीनाथ भिकु कामथे पौड
सुनिल आनंदराव जावळे वडगांव मावळ
बबन पांडुरंग भवारी खेड
रोहीदास राजाराम चौधर वालचंदनगर
सिताराम सिंधु ठोकळ मसुप खंडाळा
नारायण भाऊसाहेब खंडागळे सासवड
वसंत गणपत राक्षे आंजिब जुन्नर चालक
ज्ञानेश्वर रामचंद्र करडे मुख्यालय
नवनाथ गोपा सानप मुख्यालय
हनुमंत विठ्ठल घोळवे बारामती शहर
बबन जयवंत जाधव दौंड
मुस्ताक अब्दुल रहेमान खान जिविशा