लोणी काळभोर, (पुणे) : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, विश्वराजबाग येथे शनिवारी (ता. 24) घेतली जाणार होती. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केली नसून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई पदाच्या 2022-23 च्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक 20 ऑगस्टला घोषित करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या एकूण 5 हजार 544 उमेदवारांची दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.