पाटणा: बिहारमध्ये बुधवारी (21 ऑगस्ट) ‘भारत बंद’चा संमिश्र परिणाम दिसून आला. मात्र, राजधानी पाटण्यात झालेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी डाकबंगला चौकात लाठीमार केला. यावेळी आंदोलकांना बॅरिकेडिंग लावून थांबवण्यात आले. पोलिसांनी वॉटर कॅननचाही वापर केला. दरम्यान, जमावात एसडीएम श्रीकांत खांडेकरही पोलिसांच्या लाठीमाराचे बळी ठरले. गर्दीत एसडीओ श्रीकांत खांडेकर सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याचे कॉन्स्टेबलच्या लक्षात आले नाही आणि त्यांना आंदोलक समजत त्यांनी त्यांना दोन लाठ्या मारल्या.
SDM saahab ko hi koot diya patna main 🤣🤣 (0.6 – 0.9) #BharatBandh pic.twitter.com/gCG8h9sK7Q
— Prayag (@theprayagtiwari) August 21, 2024
भारत बंद आणि हिंसक आंदोलनामुळे डाकबंगला चौकात दुकाने बंद होती. काही दुकाने सुरु होती. परंतु, दुकानदारांनी आंदोलनादरम्यान शटर खाली केले. मात्र, पाटणाच्या डीएमने यापूर्वीच निर्देश दिले होते की, कोणत्याही प्रकारची अनागोंदी खपवून घेतली जाणार नाही. बळाचा वापर करणाऱ्या, वाहतूक विस्कळीत करणाऱ्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सामान्य जनजीवन प्रभावित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा लोकांवर एफआयआर नोंदवून कठोर कारवाई केली जाईल, असंही म्हटलं होतं.