नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातुन एक धकाकड्याक बातमी समोर येत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात एका शेतात रखवालदार म्हणून काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करत ठार मारले आहे. तसेच आजीच्या शोधात गेलेल्या नातवावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला त्या हल्ल्यात नातवाला सुद्धा आपला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्याने येथे वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. तर अनेकदा बिबट्याचा मुक्त संचार सुद्धा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहादा तालुक्यातील चिखली येथे दोन बालकांवर बिबट्याने केल्याची घटना घडली असतानाच तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पन्नास वर्षीय साकरा खेमा तडवी ह्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होत्या. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत जंगल परिसरात घेऊन जात जीवे मारले.
आजीच्या शोधात गेलेल्या नातवालाही बिबट्याने आपले केले भक्ष आहे. आजी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा नऊ वर्षीय नातू श्रावण शिवाजी तडवी हा आजीला शोधायला शेतात गेला. मात्र, त्याच्यावर देखील बिबट्याने हल्ला करून त्याचा सुद्धा जीव घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचे बंदोबस्त करावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.