मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 378.18 (0.47%) अंकांच्या वाढीसह 80,802.86 वर व्यवहार बंद झाला. तर निफ्टी 126.20 (0.51%) अंकांनी वाढून 24,698.85 वर पोहोचला.
बँकिंग, वित्तीय आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समुळे बाजाराला बळ मिळाले असून, जागतिक शेअर बाजारातील मजबूत कल राहिला. शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 378.18 अंकांनी वाढून 80,802.86 वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान, बेंचमार्क 518.28 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी वाढून 80,942.96 वर पोहोचला. सलग चौथ्या दिवशी वाढ झाल्यानंतर NSE निफ्टी 126.20 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी वाढून 24,698.85 वर पोहोचला.
‘या’ शेअर्समध्ये झाली वाढ
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर भारती एअरटेल, आयटीसी, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्स याच्या किंमती कमी झाल्याचे पाहिला मिळाले.