गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिल्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा झाले. हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी होत आहे. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवार पासून बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे.
मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला. काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हफ्ते स्वातंत्र्यदिनी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थी महिलांनी बॅंकेत गर्दी केली होती. राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये जमा केले आहेत.
दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस व रक्षाबंधनचा सन यामुळे मंगळवारी महिलांनी डोर्लेवाडी येथील युनियन बँकेत तोबा गर्दी केली होती. त्यामुळे येथील बँक व्यवस्थापनावर चांगलाच ताण आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.