शिक्रापूर (पुणे) : बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रतीक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संतोष नामदेव मिसाळ (वय ४६, रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. कळंबेश्वर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मलठण फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. दारूची विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, प्रतीक जगताप यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.