पुणे : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली होती. सोशल मीडियावर त्याचे निधन झाल्याची बातमी पसरली होती. या खोट्या अफवांवर त्याने स्वत:च पुढे येऊन याबाबत खुलासा केला आहे. त्याने यासंदर्भातला सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तो म्हणाला की, मी जिवंत आहे, आनंदी आहे आणि ठिक आहे.’
श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, “मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. मी मेल्याचा दावा करणारी पोस्ट पाहिली. मला माहित आहे की विनोदाला त्याचे स्थान आहे, परंतु जेव्हा त्याचा गैरवापर होतो तेव्हा ते हानिकारक असू शकते. कोणीतरी गंमत म्हणून सुरुवात केली असेल पण त्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास झाला. हे त्यांच्या भावनांशी खेळत आहे.” असं तो म्हणाला.
पुढे श्रेयस म्हणाला,’माझी छोटी मुलगी आहे, जी रोज शाळेत जाते. ती आधीच माझ्या आरोग्याला घेऊन चिंतेत असते. ती सतत मला प्रश्न विचारते. मी ठिक आहे ना हे विचारते. या अफवेमुळे ती आणखी घाबरली आहे. ती शाळेत तिच्या शिक्षकांना आणि मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारू लागली. जे लोक माझ्या निधनाच्या बातमीला हवा देत आहे, मला त्यांना इथेच थांबवायचं आहे. अनेकांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. कोणताही विनोद कोणाच्या भावनांना दुखावू शकतो. माझं कुटुंब आणि शुभचिंतक असलेल्या सगळ्यांना या विनोदानं त्रास झाला आहे.
दरम्यान, अभिनेता श्रेयस तळपदेला ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता अभिनेत्याची तब्येत एकदम ठणठणीत आहे.