पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीमध्ये खेळायला आलेल्या मुलाला तू येथे खेळायला का आलास असे म्हणून १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर वस्तार्याने सपासप वार केले आहेत. समर गजानन जाधव असे वार केलेल्या मुलाचे नाव आहे. हि घटना अन्सारी हाऊस बिल्डिंग समोरील जागेत शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजऱ्यांच्या सुमारास कोंढवे धावडे येथे घडला आहे. या घटनेत समर गजानन जाधव हा गंभीर जखमी झाला आहे.
अखिल गजानन जाधव (वय-४०, रा. विक्रोळी, वेस्ट, मुंबई) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र सोपान बिडकर (वय-५५, रा. भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा समर हा खेळण्यासाठी खाली मैदानात गेला होता. त्यावेळी, राजेंद्र याने समरला विचारले कि तू येथे खेळायला का आला आहे. असे म्हणत त्याने त्याच्यावर वस्तार्याने त्याच्या डाव्या गालावर डाव्या डोळयाच्या खाली आणि डाव्या कानाच्या वरच्या बाजूला वार करुन गंभीर जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायगौंडा करत आहेत.