पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभेत शड्डू ठोकत उमेदवारीसाठी दावा केला आहे. बालवडकर कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असून बंडखोरीच्या तयारीत देखील आहेत.
चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. या मतदार संघात मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. त्यांची उमेदवारी रद्द करून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना हा मतदार संघ देण्यात आला होता. आता इथल्या स्थानिक नगरसेवकांनेच या मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बालेवाडीत महायुतीने शक्तिप्रदर्शन केले. मात्र, हे शक्तीप्रदर्शन कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारने केल्याचा दावा होता. कोथरूडमध्ये सध्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तरी सुद्धा माजी नगरसेवक अमोर बालवडकर यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच इच्छुक असणं यात काही गैर नसल्याचं ही ते यावेळी म्हणाले आहेत. असं असलं तरी त्यांनी पक्षातल्या बड्या नेत्यालाचा आव्हान दिले आहे. बालवडकर हे माजी नगरसेवक असून शहर सुधार समितीचे अध्यक्ष आहेत. भाजप मध्येच कोथरूड विधानसभेवरून कहलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.