सोलापूर : बिअर शॉपी टाकण्यासाठी विवाहितेला पैशाची मागणी करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शामल मंगेश शिंदे (रा.निर्मिती विहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती उमेश उर्फ बापू रमेश काळे, सासू इंदुबाई रमेश काळे (रा.मुंबई, मूळ रा. बोरामणी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील फिर्यादी यांची मुलगी पूजा हिला तिची सासू इंदुबाई काळे हिने तुला काही काम येत नाही म्हणून मानसिक त्रास दिला. तसेच पती उमेश काळे याने मला बायकोची गरज नाही, मला बिअर शॉपी टाकायची आहे. त्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत पैशाची मागणी केली. तसेच पूजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.