मुंबई : पंजाब नॅशनल बँकेने नेत्रहीन ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेले नवीन डेबिट कार्ड लाँच केले आहे, पीएनबीने अन्तः दृष्टी ब्रेल डेबिट कार्ड लाँच केले आहे. हे संपर्करहित एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) डेबिट कार्ड रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे.
पीएनबी अन्तः दृष्टी ब्रेल डेबिट कार्ड लाँच केल्याने सर्वसमावेशकता आणि आर्थिक सुलभतेसाठी बँकेची बांधिलकी दिसून येते. दृष्टिहीन लोकांसाठी आर्थिक स्वातंत्र्य आणि सुविधा वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.