सासवड : पुरंदर तालुक्यातील जेजुरी आणि पुरंदर व बारामती तालुक्यातील ७२ वाडी-वस्ती आणि गावांना वरदान असणारे मल्हार सागर, नाझरे धरण गुरुवारी (दि. १५) पुर्ण क्षमतेने भरले आहे. मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस पडत आहे.
त्यामुळे नाझरे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी कन्हा पात्रात जाऊ लागले आहे. त्यामुळे पुरंदर व बारामतीच्या जनतेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नाझरे धरण पूर्णपणे भरल्याने माजी आमदार अशोक टेकवडे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, जेष्ठ पत्रकार प्रकाशजी भोईटे, भाजपा किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेंडकर, भाजपा सरचिटणीस गणेश मेमाणे, भाजपा पदाधिकारी हनुमंत काळाणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होती.