पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी गाव भेटीचे दौरे सुरु केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांमध्येही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
रोहित पवार म्हणाले, कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघामध्ये माझ्या विरोधात अजित पवार उभे राहू शकतात असं विधान केले आहे. काही कंपनी सर्व्हे केले जात असून त्यामध्ये जय पवार, पार्थ पवार यांची नावं असल्याची माहिती आहे. मात्र, कर्जत-जामखेडची जनता माझ्या बरोबर असल्याचंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.