पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि.१२) शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुपकुमार सतीषचंद सक्सेना (वय ६६, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवांश सिंग, जेसिका एवेलिना, सुरेश कुमार व संबंधित मोबाईल क्रमांक धारक आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गहुंजे येथील लोढा बेलमेंडो सोसायटीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. फिर्यादी यांना एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांचे पैसे व नफा परत न देता आर्थिक फसवणूक केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.