सौरभ सुतार
निरा नरसिंहपुर : पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सालाबाद प्रमाणे ग्रंथाचे वाचन चालू आसलेला संपूर्ण भावार्थ रामायणाची सांगता समाप्ती जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज गुरुवर्य श्री.बापूसाहेब मधुसूदन मोरे (महाराज) यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १९) रोजी होणार आसल्याची माहिती पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त बाळासाहेब घाडगे महाराज यांनी दिली.
यावर्षीचा संपूर्ण भावार्थ रामायण सोहळा ३० ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण रामायण ग्रंथाचे वाचन पार पाडून समाप्ती सोहळा होणार आहे.
या समाप्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंदिरातील हानुमान मुर्तीस अभिषेक करून होणार आहे. अखिल भारतीय वारकऱ्यांचे हृदयस्थान व तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य श्री बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्गदर्शना खाली व डॉ. लक्ष्मण आसबे महाराज यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातुन रामफेरी व ग्राम प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता ग्रंथाचे वाचन करून शेवटी भक्तांनसाठी महाप्रसाद घेऊन ग्रंथाची सांगता होईल.
समाप्ती सोहळ्यासाठी भगवान पंढरीनाथ काटकर व ग्रामपंचायत सदस्य विद्यादेवी आबासाहेब बोडके यांच्यावतीने संपूर्ण महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके माजी सरपंच आबासाहेब बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, आशोकआबा बोडके, संचालक संजय बोडके, भक्त संदिपान पडळकर, महादेव सुतार, बाळासाहेब घाडगे, महेश सुतार हे विशेष मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यासाठी सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.