बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावच्या सरपंचपदी हरिष नारायण शेंडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी बापूसाहेब नामदेव देवकर यांनी काम पाहिले. तलाठी भाऊसाहेब पांढरपट्टे उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच कविता संजय शेंडकर, माजी सरपंच दिलीप किसन शेंडकर, माजी सरपंच नितीन शंकर शेंडकर, माजी उपसरपंच मनस्वी रायचंद शेंडकर, माजी उपसरपंच मोहिनी संतोष हंबीर, माजी उपसरपंच योगिता दत्तात्रय थेऊरकर, सदस्य काळूराम किसन हंबीर, सदस्य अनिता दीपक शेंडकर ,ग्रामसेवक अमित जाधव सर्व कर्मचारी वृंद आदिसह आजी माजी सरपंच, उपसरपंच सोसायटीचे चेअरमन, सदस्य आणि ग्रामस्थ महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिष शेंडकर हे पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर यांचे ते बंधू होत तर पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष विजयनाना कुंजीर यांचे ते मेहुणे होत.